Navi Mumbai Crime : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . एका १७ वर्षाच्या गरोदर मुलीने आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं असून प्रेम प्रकरणातून प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही ५ महिन्याची गरोदर होती. गोवंडी येथे राहणाऱ्या एका मुलाशी या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याच प्रेमसंबंधातून ही मुलगी गरोदर राहिली. धक्कादायक म्हणजे गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने मुलीला लग्नाला नकार दिला.
मुलगी गरोदर राहिल्याची माहिती कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तिला विचारणा केली. त्यानंतर या मुलीने टोकच पाऊल उचलत आत्महत्या केली. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.