मुंबई : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले नऊ संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी बड्या नेत्यांची नावं दिली आहेत. विशेष म्हणजे काही दिवसापासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे. या जागेमुळे महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय पहिल्या 9 उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे.
शरद पवारांची 9 जणांची संभाव्य यादी पुढीलप्रमाणे:
- बारामती-सुप्रिया सुळे
- माढा-महादेव जानकर(रासप)
- सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
- शिरुर-अमोल कोल्हे
- नगर दक्षिण-निलेश लंके
- बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
- वर्धा-अमर काळे
काँग्रेसची 7 उमेदवारांची पहिली यादी
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपआपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची पहिली यादी कालच 21 मार्चला जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज, लातूरमधून शिवाजीराव कळगे, नंदुरबारमधून गोवळ पाडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे आणि अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पाठोपाठ आता शरद पवार यांच्या उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाली आहे.