मुंबई : मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील लोअर परेल भागात एका झोपडीवर व्यावसायिक युनिटच्या भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या कोसळलेल्या भिंतीखाली एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक 60 वर्षीय महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रेणुका अनंत काळसेकर असे मृत महिलेचे नाव आहे, तर जयश्री गौतम पवार असे जखमी महिलेच नाव आहे. त्यांच्यावर केएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज २९ जून रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंडियाबुल्स कॉम्प्लेक्सजवळ घडली.
ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानकांनी याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं.