पुणे प्राईम न्यूज: मुंबईमध्ये गोरेगाव येथील एका सोसायटीच्या इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 51 जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जय भवानी भवनला पहाटे ३ वाजता आग लागली. ही सात मजली इमारत गोरेगाव पश्चिम येथील आझाद नगर भागात आहे.
या आगीत ५१ जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन मुले आणि दोन महिलांसह सहा जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईतील गोरेगाव येथे लागलेल्या आगीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सातत्याने महापालिका आयुक्त आणि पोलिसांशी बोलत आहे. जे घडले ते दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती मी शोक व्यक्त करतो. सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर सरकारकडून उपचार केले जातील, असं देखील शिंदे म्हणाले.
#WATCH | Goregaon Fire | Mumbai: Latest visuals from the spot.
A fire broke out in Mumbai’s Goregaon area late last night in which a total of 51 persons were injured. 7 deaths have been reported so far. Whereas the condition of 5 is critical, 35 persons are being treated and 4… pic.twitter.com/3VlaU99NCY
— ANI (@ANI) October 6, 2023
दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले,“ही अत्यंत दुःखद घटना आहे. या आगी संदर्भात उच्चस्तरीय चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाईल, जी 15 दिवसांत आपला अहवाल देईल. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जाईल. जखमींना उत्तम उपचार दिले जातील, असं लोढा यांनी सांगितले.
ही आग आटोक्यात आण्यासाठी चार तास लागले. आग विझवण्याच्या कामात आठ फायर इंजिन आणि इतर उपकरणे वापरण्यात आली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तळमजल्यावरील दुकाने, भंगार साहित्य, पार्क केलेल्या वाहनांना आग लागली, त्यामुळे लोक वेगवेगळ्या मजल्यावर अडकले.
हेही वाचा:
टीम इंडियाला मोठा धक्का; शुभमन गिलला डेंग्यूची लागण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला मुकणार?