Lok Sabha Election 2024 : देशात १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ८८ लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पार पडलं. केरळमध्ये २०, कर्नाटकमध्ये १४, राजस्थानमध्ये १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ८ जागा, मध्य प्रदेशात ६, आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी ५, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी ३, त्रिपुरामध्ये १ आणि जम्मू-काश्मीरमध्ये २ जागांवर मतदान पार पडलं आहे.
दरम्यान, सायंकाळी ६ वाजता मतदान संपलं. महाराष्ट्रातील या आठ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या एकूण २०४ उमेदवारांचे भवितव्य मत पेटीमध्ये बंद झालं आहे. या निवडणुकीचा चार जूनला निकाल लागणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान, तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे.
लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
- वर्धा – ५६.६६ टक्के
- अकोला -५२.४९ टक्के
- अमरावती – ५४.५० टक्के
- बुलढाणा – ५२.२४ टक्के
- हिंगोली – ५२.०३ टक्के
- नांदेड – ५२.४७ टक्के
- परभणी -५३.७९ टक्के
- यवतमाळ – वाशिम -५४.०४ टक्के