मुंबई : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे 5 ते 6 डबे घसरले आहे. यामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे काही डबे पालघरजवळील मार्गावरील पलटी झाले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील ट्रॅक नंबर एक आणि दोन प्रभावित झाले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्टेशनवरती मालगाडीचे 5 ते 6 डब्बे पुर्णपणे पलटी झाल्यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. अपघातामुळे रेल्वेचं मोठं नुकसान झालं असून रेल्वे रुळाजवळील इलेक्ट्रीक पोलही आडवा झाल्याचं दिसून येत आहे.
मालगाडीचे डबे पूर्वव्रत करण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन काही काळासाठी बंद होण्याची शक्यता आहे. मालगाडीतून वाहतूक करण्यात येत असलेल्या सामानाचेही नुकसान झाले असून अपघातानंतर रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचे काही डब्बे घसरले आहेत तर काही डब्बे पुर्णपणे पलटी झाले आहेत. या मार्गावर जाणा-या सर्व रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. यावेळी या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.