मुंबई: संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि मतदार संघातील जनतेच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा महाराष्ट्रातील 5 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराला संससदरत्न जाहीर झाला आहे. आज या खासदारांना पुरस्कार दिले जाणार आहे.
प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत संसदरत्न पुरस्कार दिले जातात आज त्याचे वितरण होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे,शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याशिवाय, काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, तर कुलदीप राय शर्मा यांचाही आज सन्मान केला जाणार आहे. भाजपचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.