मुंबई : भविष्यासाठी एफडी ही नेहमी उपयोगी ठरते. वृद्धावस्थेत, एफडीवरुन मिळणारे व्याज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे उत्पन्न असते. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जितके जास्त व्याज मिळते तितकेच त्यांना फायदेशीर ठरते. सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. काही खासगी बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 8.1 टक्के व्याज दिले जात आहे. जाणून घेऊयात, त्या बॅँकांविषयी आणि त्याच्या व्याजाविषयी.
आयसीआयसी बँक
आयसीआयसी बँकेत ज्येष्ठ नागरिकांची एफडी फायदेशीर ठरू शकते. आयसीआयसी बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. हा दर 2 वर्षे, 1 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर दिला जात आहे. या एफडीमधील तुमचे पैसे 9.6 वर्षात दुप्पट होतील.
आयडीएफसी बँक
आयडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिक एफडी वर 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. ही ऑफर 2 वर्ष, 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडी वर दिली जात आहे. जर तुम्ही या एफडी मध्ये पैसे गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 9.2 वर्षे लागतील.
डीसीबी बँक
डीसीबी बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडी वर 8.1 टक्के व्याज देत आहे. हे व्याज 26 महिने ते 37 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर दिले जात आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, या एफडीमधील तुमचे पैसे 8.8 वर्षांत दुप्पट होतील.
इंडसइंड बँक
इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 8 टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर 2 वर्षे 9 महिने ते 3 वर्षे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी एफडीवर दिला जात आहे. अशा प्रकारे, जर तुम्ही इंडसइंड बँकेत ज्येष्ठ नागरिकाची एफडी केली तर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.
आरबीएल बँक
आरबीएल बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडी वर 8 टक्के व्याज देत आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना 24 महिने ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर दिले जात आहे. आरबीएल बँकेत तुमची एफडी रक्कम दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे लागतील.