Mumbai Rape Case : मुंबईच्या वडाळा टीटी परिसरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. वडाळा टीटी भागात चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मुलीच्या आईने वडाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन वडाळा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून असून 23 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी हा पीडीत मुलीच्या ओळखीतील व्यक्ती आहे. मुलगी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने वडाळा टीटी परिसरात एका कारखान्यात नेऊन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाल्यानंतर तिने याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी २३ वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
A case of rape of a 4-year-old girl has come to light in Mumbai’s Wadala TT police station. On the complaint of the girl’s mother, the Wadala TT police registered a case against the 23-year-old accused under section 376 of the IPC and POCSO Act and arrested him. The accused was…
— ANI (@ANI) December 4, 2023