मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक कालावधीत म्हणजेच १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१८ ते २३ नोव्हेंबरपर्यंत सर्व अनुज्ञप्ती बंद राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करत असल्याचे आढळून आल्यास संबंधिताची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.