ठाणे : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहा जणांनी मिळून २८ वर्षीय तरुणीची गेल्या आठवड्यात हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. राहुल जैस्वाल (वय 28) असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहा व्यक्तींनी २८ वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यात मिर्चीचा स्प्रे मारुन निर्घृण हत्या केल्याच समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून अन्य चार आरोपींचा पोलीस कसून तपास करत आहेत.
नेमक काय घडलं?
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या आठवड्यात उल्हासनगरमध्ये २८ वर्षीय तरुणाची भर रस्त्यात डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० जणांनी निर्घृण केल्याची घटना घडली. उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 3 च्या फॉरव्हल लाईन भागात असलेल्या इमली पाडा परिसरात ही घटना घडली होती. दरम्यान, हत्या झालेल्या तरुणाची दुचाकी जाळली होती. यामुळे मुख्य आरोपी असलेल्या गुंडावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाच गुन्हा मागे घेणाच्या वादातून तरुणाची भर रस्त्यात आईसमोरच हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ६ जणांना ताब्यात घेतलं असून अन्य चार आरोपींचा शोध सुरु आहे.
पुण्यातील मुख्य आरोपीसह ६ जण अटकेत
आरोपींनी या घटनेनंतर पळ काढला होता. यानंतर तात्काळ स्वतंत्र तीन तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले होते. गुप्त बातमीदारच्या आधारे पुण्यातील मुख्य आरोपी प्रेमचंद उर्फ बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकनी (वय २८ वर्ष) आणि करण मनोहर ढकणी (वय २६ वर्ष) यांच्यासह त्यांचे साथीदार संतोष अरुण साळवे, प्रणय सुधीर शेट्टी, प्रफुल्ल सुरेश कुमावत, वसंत राधे ढकणी असे एकूण सहा आरोपींना अत्यंत सिताफिने २४ तासांच्या आत अटक करण्यात आलेली असून त्यांची १५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केली आहे.