पती-पत्नीचे नाते हे प्रेमाचे, विश्वासाचे असते. वैवाहिक जीवनात प्रेम, आदर आणि परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे. पण कधी कधी अशी काही वागणूक मिळते ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. नंतर हळूहळू नातं बिघडू शकते. मात्र, अशा काही गोष्टी आहेत त्याकडे विशेष लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकतं.
जेव्हा नात्यात जोडीदार एकमेकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, तेव्हा ते नात्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. वैवाहिक नात्यात बोलणे सर्वात महत्त्वाचे असते. जर तुमचा संवाद फक्त महत्त्वाच्या बाबींपुरता मर्यादित असेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते.
नातेसंबंधात, जर एखादा जोडीदार फक्त त्याच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छांवर लक्ष केंद्रित करत असेल आणि त्याच्या जोडीदाराच्या भावना किंवा गरजांकडे दुर्लक्ष करत असेल, तर ते नातेसंबंधासाठी हानिकारक असू शकते. विवाह ही परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणाची संस्था आहे. मात्र, जर फक्त एकाच व्यक्तीचे हित महत्त्वाचे असेल तर हे नाते जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.