अनेकजण फिरायला जाण्याला प्राधान्य देतात. काहीतर जाण्यापूर्वी अगदी सहा महिने-वर्षभरापूर्वी प्लॅनिंग करतात. तुम्ही देखील यातीलच एक आहात तर तुमच्यासाठी आम्ही एक पर्याय सांगणार आहोत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात आहे हे ठिकाण.
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेले ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ नॅशनल पार्क आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या ठिकाणी फुलांचं अक्षरश: जग असल्याचे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. जिथे हिमालयातील दुर्मिळ वनस्पतीही पाहायला मिळतात. त्याला इंग्रजीत ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणतात. बर्फाच्छदित पर्वत आणि त्यातून वाहणारी पुष्पावती नदी यांच्या मधोमध असलेले नयनरम्य स्थान यामुळे हे ठिकाण जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते.
‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ सध्या पर्यटकांसाठी खुले जरी असले ते 31 ऑक्टोबरपर्यंतच असणार आहे. या ठिकाणी जाण्यासाठी शुल्क भारतीयांसाठी 200 रुपये आणि परदेशी नागरिकांसाठी 800 रुपये असणार आहे. हे एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणूनही पुढे आहे. तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करणार असाल तर त्याठिकाणी एकदा भेट द्याच.