सध्या घरांच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हे दर दिसत आहेत. असे जरी असले तरीही वन बीएचकेपेक्षा चांगला आणि प्रशस्त टू बीएचके, थ्री बीएचके घेण्याला अनेकांकडून पसंती दिली जात आहे. अशाप्रकारे मोठा आणि प्रशस्त फ्लॅट असल्याने लहान मुलांना देखील त्यांची सेपरेट रुम मिळते. पण, ही रुम कशी असावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.
मुलांच्या रुमसाठी फर्निचर सेट करताना, सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. रुममध्ये धारदार आणि हँगिंग फर्निचर कधीही ठेवू नका. तसेच, डबल स्टोरी किंवा हाय बेड सेट करू नका. यामुळे मुलांना दुखापत होऊ शकते. रुमला सुंदर लूक देण्यासाठी तुम्ही रंगीबेरंगी मच्छरदाणी वापरू शकता. मुलांना रंगीबेरंगी गोष्टी जास्त आवडतात. अशा स्थितीत मुलांच्या खोलीला त्यांच्या आवडत्या रंगात पेंट करणे चांगले होईल.
तुम्ही यासाठी थीम देखील ठरवू शकता. जर तुमचा वास्तूवर विश्वास असेल तर रूमची पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही रूमला वास्तुनुसार कलर देऊ शकता. मुलासाठी स्टडी टेबल नीट सेट करा. रिव्हॉल्व्हंग स्टडी टेबल आणि चेअर वापरू नका. यामुळे मुले टेबल आणि खुर्ची हलवू शकतात, ज्यामुळे त्यांना दुखापत होऊ शकते.
यासोबतच तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर सकारात्मक ऊर्जा देणारी झाडे देखील सजवू शकता. अशाप्रकारे काही पर्याय अवलंबले तर नक्कीच फायदा होऊ शकतो.