बहुतांश लहान मुलांची शाळा ही सकाळीच असते. ही शाळा सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान असल्याने त्याची तयारी सकाळी सहा-साडेसहा वाजल्यापासूनच करावी लागते. त्यामुळे झोपेत असलेल्या आपल्या लहान मुलांना सकाळी उठवायचं कसं हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. पण याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्यासाठी सर्वप्रथम मुलांचे टाईमटेबल अर्थात वेळापत्रक तयार करा. कधी उठायचं, कधी कोणतं काम करायचे, जेवायचे आणि झोपायचे यामुळे त्यांचं एक रुटीन फिक्स होईल. त्या रुटीनची सवय झाली की, मुलं लवकर उठायला लागतील आणि चिडचिडदेखील करणार नाही. तुम्ही जर घरी नसाल तर मुलांसाठी अलार्म सेट करून घ्या. याने मुलं स्वतःहून उठतील. काही आईवडील आपल्या मुलांना दुपारी झोपण्यास सांगतात. परंतु, जर मुलांनी त्यांची झोप दुपारीच पूर्ण केली तर त्यांना रात्री लवकर झोप येणार नाही. त्यामुळे मुलांना दुपारी झोपू देऊ नका.
याशिवाय, घरात पॉझिटिव्ह वातावरण राहील याकडे विशेष लक्ष द्या. सकाळी चांगलं वातावरण निर्माण करा. मुलांना शांतपणे बोलून समजावून उठवा. जास्त राग केल्याने मुलं हट्टी होऊ शकतात. ऐकत नाहीत त्यामुळे प्रेमाने समजावून सांगा. त्यांना जितक्या शांततेने उठवता येईल तेवढं उठवा. त्याने बदल दिसून येऊ शकतो.