पुणे प्राईम न्यूज डेस्क : ध्या पुरूषांच्या बरोबरीने महिला देखील कामामध्ये कमी नाहीत. घरातील जबाबदारी सांभाळून, संसाराकडे लक्ष देऊन महिला आपली ऑफिसच्या कामाची जबाबदारीही चोखपणे पार पाडताना दिसतात. पण यामध्येच त्या अनेकदा गुंतून राहिल्याने आहाराकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. मात्र, असे करणं थांबवलं पाहिजे.
कामाला जाणाऱ्या महिला अर्थात वर्किंग वूमन्सनी आपल्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ब्रेकफास्ट आणि लंच यात चार ते पाच तासांचे अंतर हवे. लंचमध्ये भाजी, डाळ, दही, भात आणि पोळीचा समावेश करावा. हिरव्या भाज्या जसे ब्रोकोली, पालक, मेथी व इतर आहारात समावेश करावा. लंचमध्ये सॅलेड किंवा कोशिंबीर खावी. घरातून निघण्यापूर्वी आपण दूध, सांजा, कॉर्नफ्लेक्स खाण्याला प्राधान्य द्यावे. सकाळच्या नाश्त्यात व्हिटॅमिन ‘ए’ युक्त फळं जसे पपई आणि स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर ठरेल.
ब्रेकफास्टसाठी वेळ नसल्यास एक ग्लास दूधाबरोबर कोणतंही फळ घ्यावं. याबरोबरच थोडेसे ड्रायफ्रुट्स आपल्याजवळ ठेवावे. याने फायद्याचे ठरू शकते. ऑफिसमध्ये काम करणारी काही लोकं संध्याकाळी भूक लागल्यावर काही अनहेल्थी फूड खातात, जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. संध्याकाळी भूक लागल्यावर फळं किंवा कडधान्य खाणे फायद्याचे ठरेल. याने भूकही भागेल आणि आरोग्यासाठी उत्तमही ठरेल.