आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. पण काही गोष्टींमुळे सौंदर्यामध्ये कमी दिसून येते. त्यात नाकावर जर व्हाईटहेड्स असतील तर ते कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास तुम्हाला फरक जाणवू शकतो.
त्वचेसाठी बेकिंग सोड्याचा वापर केला जातो. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. लिंबाचा तुकडा घेऊन त्यावर बेकिंग सोडा टाकून नाकावरील व्हाईटहेडला चोळा. त्यानंतर पाच मिनिटं लिंबू व्यवस्थित नाकावर घासून घ्या. यामुळे नाकावरील व्हाईटहेड निघून त्वचा स्वच्छ होईल.
तसेच नाकावरील व्हाईटहेड काढण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा कोरफड जेल घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण नाकावरील व्हाईटहेडला लावा. हलक्या हाताने स्क्रब करून व्हाईटहेड हातांच्या सहाय्याने काढा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
कॉफी स्क्रबच्या सहाय्याने तुम्ही नाकावरील व्हाईटहेड्स काढू शकता. यासाठी एकदा वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात थोडीसे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण नाकाला लावून हलक्या हाताने चोळा. यामुळे व्हाईटहेड पूर्णपणे निघून जाऊ शकतील.