सध्या पावसाळा संपून हिवाळा सुरु झाला आहे. हिंदू परंपरेनुसार तुळशी विवाहानंतर बहुतांश लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. यामध्ये मुली साडी किंवा लेहेंगा घालणे पसंत करतात. मात्र, या कडाक्याच्या थंडीपासून सुरक्षित राहणे आणि स्टायलिश दिसणे हे सर्वात मोठे आव्हान बनते. जेव्हा मुली लग्नात लेहेंगा-साडीसारखे पारंपारिक कपडे घालतात तेव्हा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काही खास कपड्यांची गरज भासते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
लेहेंग्यावर लांब एथनिक जॅकेट किंवा काश्मिरी शाल घातल्याने तुम्ही स्टायलिश दिसाल आणि थंडीपासून तुमचे संरक्षणही कराल. तुम्ही शाल तुमच्या खांद्यावर ओढू शकता किंवा तुमच्या शरीराभोवती पूर्णपणे गुंडाळा. रेशीम, मखमली किंवा लोकर यांसारखे उबदार कापड शाल किंवा जाकेटच्या खाली वापरल्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. लेहेंगा किंवा साडी नेसण्यापूर्वी तुम्ही थर्मल टॉप आणि लेगिंग्ज घालू शकता. हे तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत करतील.
तसेच थर्मल फॅब्रिक हलके असते, त्यामुळे ते शरीराला चिकटून राहते आणि लेहेंगाच्या खाली चांगले बसते आणि थंडीपासून संरक्षण करते. पार्का जॅकेट्स फायद्याचे ठरू शकते. पार्का जॅकेट्समध्ये एक हुड देखील असतो, जो थंड वाऱ्यापासून डोके आणि मानेचे संरक्षण करतो. तुम्ही हे ओव्हर लेहेंगा घालू शकता आणि यामुळे लूकही मस्त आणि आरामदायी होतो.