पुणे प्राईम न्यूज : शारदीय नवरात्रीला सुरूवात झाली आहे. नवरात्रोत्सवात उत्साह आणि जल्लोषात गरबा, दांडिया खेळला जातो. कित्येक तरुण- तरुणी आवडीने यात सहभागी होतात. या सणाची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. काहीजण तर गरबा खेळण्यासाठीच नवरात्रीचीच आवर्जुन वाट बघत असतात. कोणताही सण असो प्रत्येक सणावाराला महिला आपली नटण्या-मुरडण्याची हौस भागवून घेतात.
गरबा, दांडीया खेळायला जायचं म्हटलं की मस्त घेरदार घागरे, मॅचिंग दुपट्टा, हेअरस्टाईल, आणि मेकअप असे सगळं छान आवरुन आपण बाहेर पडतो. तासनतास गरबा खेळून अनेकदा मेकअप खराब होण्याची शक्यता असते. गरबा खेळून घाम आल्यानंतर मेकअप पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे बाहेर जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना वॉटरप्रूफ मेकअप करण्यावर जास्त भर द्यावा. वॉटरप्रूफ मेकअप केल्यामुळे मेकअप लवकर खराब होत नाही आणि अधिक काळ मेकअप तसाच टिकून राहतो.
असा करा वॉटरप्रूफ मेकअप…
– वॉटरप्रूफ मेकअप करण्यापूर्वी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
– त्यानंतर कपड्याच्या साहाय्याने चेहरा पुसून घ्या.
– नंतर तुमच्या त्वचेला सूट होईल असे टोनर, सीरम टाकून काही वेळ त्वचा सेट होण्यासाठी ठेवा.
– त्यानंतर काचेच्या वाटीमध्ये लिक्विड फाउंडेशन, सेटिंग पावडर, इल्युमनेटिंग मॉइश्चरायझर, प्रायमर, सेटिंग स्प्रे घेऊन एकत्र मिक्स करा.
– तयार मिश्रण ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. ब्लेंडरच्या सहाय्याने सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या.
– त्यानंतर लिपस्टिक, काजळ, आयलायनर लावा. अशा पद्धतीने मेकअप केल्यास तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील आणि मेकअप लवकर निघणार नाही.