Lifestyle : महिला असो वा पुरुष आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यात सौंदर्यात भर टाकते ते म्हणजे केस. विशेषत: महिलावर्गात केसांबाबत जास्त काळजी घेतली जाते. केस मूळापासून दाट आणि लांबसडक कसे राहतील, याच्या प्रयत्नात अनेक महिला असतात. पण आम्ही तुम्हाला याची माहिती आज देणार आहोत.
‘एग हेअर मास्क’ हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. अंड्यातील प्रथिने आणि बायोटिन केसांचे पोषण करतात. आठवड्यातून एकदा केसांना अंड्याचा मास्क लावल्याने केसांची चमक आणि मजबूती वाढते. तसेच कांद्याचा रसही फायद्याचा मानला जातो. कारण, कांद्यामध्ये सल्फर असते, जे केसांच्या मूळांना मजबूत करते. त्यामुळे कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ सुधारते आणि ते दाटही होतात.
कोरफड अर्थात एलोवेरा याच्या जेलचा वापर गुणकारी ठरू शकतो. केसांच्या मूळांवर कोरफडीचे जेल थेट लावल्याने केस मॉइश्चरायझेशन राहतात. यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना मजबूत करतात आणि केस गळणे टाळतात. याशिवाय, केसांच्या आरोग्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. यामुळे केस मॉइश्चरायझेशन राहतात आणि ते मजबूत होतात.