LifeStyle : शुद्ध घी अर्थात तूप चांगले आरोग्यदायी असल्याचे आहे. त्यामुळे याचा आहारात समावेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, अनेकदा हे तूप आपण दुकानातून आणतो. मात्र, तुम्हाला माहितीये का हेच तूप अगदी घरच्या घरी बनवता येऊ शकते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
मलईपासून तूप बनवणे अगदी सोपे आहे. हे तयार करण्यासाठी सुमारे अर्धा किलो मलई घ्या. यासाठी तुम्ही दुधाच्या वरील मलईचा थर काढून रोज एका भांड्यात ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते खराब होणार नाही. तुम्ही पुरेशा प्रमाणात मलई गोळा केल्यावर तूप बनवण्याची प्रक्रिया सुरू करू शकता. यासाठी प्रथम फ्रीजमधून क्रीम काढून बाहेर ठेवा, जेणेकरून ते सामान्य तापमानावर येईल.
आता क्रीम एका पॅनमध्ये ठेवा आणि एकत्र करून घ्या. त्यानंतर हळूहळू थंड पाणी घाला. यानंतर हे लोणी काढून एका जड तळाच्या पातेल्यात टाकून गॅसवर ठेवा. लक्षात ठेवा गॅस हलका असावा. तुपाला गोड वास येऊ लागला आणि त्याचा रंग हलका सोनेरी झाला की आचेवरून उतरवा.
स्वच्छ कापडातून किंवा चाळणीतून तूप गाळून घ्या, जेणेकरून तूप त्यातील उरलेल्या घन पदार्थापासून वेगळे होईल. अशाप्रकारे तुम्हाला घरच्या घरी तूप बनवता येऊ शकणार आहे.