आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण वयाची 30-35 वर्षे पार केल्यानंतर काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्यामुळे या सुरकुत्या कमी करण्यावर भर दिला जातो. मात्र, असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास फायद्याचे ठरू शकते.
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अकाली वृद्धत्वामुळे तुमचे वय अधिक दिसून येते आणि ते चांगल्या आरोग्याचे लक्षण नसते. जर तुमचे वय 30 वर्षे असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर तुम्ही काही टिप्स अवलंबून त्यावर मात करू शकता. वाढत्या वयानुसार, त्वचेमधील चमक कमी होते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात.
चेहऱ्यावरील ऊती आणि मलस टोन गमावतात आणि त्वचा सैल होतात. पण, पावडर किंवा द्रव स्वरूपात कोलेजन सप्लिमेंट उपलब्ध आहेत, जे दैनंदिन आहारामध्ये पुरेसे कोलेजन पातळी राखण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदतीचे ठरू शकतात. पण जर तुम्ही पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केले तर ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. सुरकुत्या कमी करण्यासाठी नियमितपणे चेहऱ्याला मसाज करा. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझेशन राहील आणि सुरकुत्या येणार नाहीत.
ऑलिव्ह ऑईल गुणकारी मानले जाते. हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असून, सुरकुत्या दूर करण्यास मदत करू शकते. ज्यामुळे सुरकुत्या आणि त्वचेच्या रेषा कमी होतात.