जगभरात पर्यटनाला जाण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. तिथली माहिती जरी एकदा मिळाली तर मग जाण्याचा प्लॅन केल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. त्यात भूतान, फिजी, नेपाळ यांसारखे देश आहेत. तेथील पर्यटनालाही विशेष स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणाची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
फिजी या देशात एकूण 300 बेट असून, द्वीपांचा समूह द्वीपसमूह म्हणून याला ओळखले जाते. या देशांत भारतीय पर्यटक एकूण 120 व्हिसाशिवाय राहू शकतात. सर्वात विकसित देशांपैकी एक फिजी हा देश आहे. इथे तुम्हाला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतील आणि यातील पाणी इतके स्वछ असते, पाण्याच्या खालील खडकदेखील तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतात. याशिवाय, भूतान हा देश भारताच्या बाजूलाच असून, आपण याला आपला शेजारी देश असेही म्हणू शकतो. हा देश हिमालयीन सौंदर्याने नटलेले आहे.
या देशात भारतीयांना व्हिसाशिवाय फिरण्याची परवानगी आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेपासून ते ट्रेकिंगपर्यंत तुम्हाला इथे अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल. इथे बौद्ध धर्माची लोकं अधिक आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला बौद्ध मंदिरे आणि त्यांची सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. याशिवाय, नेपाळ हा देखील भारताच्या शेजारील दक्षिण आशियाई देश आहे. या देशातही भारतीयांना व्हिसाशिवाय फिरता येऊ शकते. हिमालयावर वसलेला देश म्हणून याची ओळख आहे. इथं एकदा गेल्यास त्याचा फायदा मिळू शकतो.