पुणे प्राईम न्यूज डेस्क : सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण नेहमीच महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमेचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याची सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती असते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक खास क्षणाला उखाण्यातून नाव घेण्याची परंपरा आहे. पूजा केल्यानंतर बायको आपल्या नवऱ्यासाठी उखाणे घेते. महिला मस्त वडाच्या झाडाकडे नटून थटून जातात, एकमेकांना नवऱ्यासाठी वटपौर्णिमेचे उखाणे घेतात.
चला तर मग तुम्ही ही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराच्या नावाचे काही खास उखाणे घेऊ शकता.
– बोलत असतानाही होते मी मग्न, …… रावांसारखे पती भेटू देत, सात जन्म
– वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यााठी जमल्या साऱ्या बायका…रावांचे नाव घेते, आता सर्वजण ऐका
– कांजीवरम साडी, बनारसी खण …रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण
– वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी …रावांची होईन मी साताजन्माची राणी
– थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा…रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा
– भरजरी साडीला जरतारी खण — चं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण
– थाटात पार पडला आज वटपौर्णिमेचा सोहळा ….रावांचे नाव ऐकण्यासाठी आज सर्वजण गोळा
– वटपौर्णिमेसाठी आज, नेसले नवीन साडी …रावांनी आज घेतली माझ्यासाठी नवीन गाडी
– वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण, …रावांचे नाव घेते, सुखात राहू दे सर्वजण