सध्या कोणतंही अज्ञात ठिकाण जरी शोधायचं म्हटलं तरी पहिल्यांदा Google Maps ला प्राधान्य दिलं जातं. या Google Maps चा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे तुम्हाला Google Maps वापरताना काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
Google Maps मध्ये त्रुटी राहिल्याने अनेक मार्ग भरकटून अपघात झाल्याचेही समोर आले आहे. पण यामागे मॅपिंग तंत्रज्ञानातील त्रुटी असू शकतात. या तंत्रज्ञानाचा आधार सॅटेलाईट इमेज, ट्रॅफिक सेन्सर, LiDAR-आधारित स्टील कॅमेरा मॅपिंग आणि युजर्सच्या डिव्हाईसवरून प्राप्त केलेला डेटा आहे. यापैकी कोणत्याही सोर्समध्ये त्रुटी असल्यास काही अपघात होऊ शकतात. LiDAR सारखी तंत्रज्ञान अचूक रिझल्ट देतात. मात्र, हे सातत्याने अपडेट होणे गरजेचे आहे.
वेळेवर अपडेट न केल्यास रस्त्यांतील बदल, नवीन बांधकाम किंवा बंद झाल्याची माहिती युजर्सची दिशाभूल करू शकते. Google Maps आणि इतर मॅपिंग सर्व्हिस युजर्सकडून डेटा गोळा करतात. जर हा डेटा योग्यरित्या तपासला गेला नाही तर चुकीची माहिती होऊ शकते. त्यामुळे गुगल मॅप्सवरील माहिती वेळोवेळी अपडेट होणे गरजेचे आहे.