आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स अर्थात सौंदर्य प्रसाधनं वापरली जातात. पण तुम्हाला माहितीये का फक्त दोन चिमूटभर मीठ वापरून तुमचा चेहरा सुंदर बनवू शकता. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.
मीठात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी करण्यास मदत करतात. चेहऱ्यावर खूप मुरुम असले तरीही तुम्ही मीठ वापरू शकता. घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवायची असेल तर मीठ वापरा. जर तुम्हाला ते वापरायचे असेल तर थोडे मीठ आणि ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल मिसळून स्क्रब बनवा आणि त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.
त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी मीठ वापरले जाऊ शकते. त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी मीठ ही एक उत्तम गोष्ट आहे. हे त्वचेचा वरचा पृष्ठभाग स्वच्छ करते आणि छिद्रांमध्ये साचलेली घाण काढून टाकते. यामुळे त्वचा ताजी आणि चमकदार दिसते.