पुणे प्राईम न्यूज डेस्क : पाणी गरम करण्यासाठी विविध साधनांचा वापर आपण करतो. त्यात हिटर, सोलर असो की गिझर याचा वापर दैनंदिन जीवनात करत असतोच. पण, गिझर आणि हिटर ही दोन्ही उपकरणे लाईटवर चालतात. त्यामुळे याचा योग्य वापर केल्यास लाईट बिल कमी प्रमाणात येऊ शकते. त्यात रात्री झोपताना गिझर बंद करणे गरजेचे असते.
सध्या विविध कंपन्यांचे गिझर बाजारात उपलब्ध आहेत, त्यापैकी काहींची किंमत जास्त असू शकते आणि काही कमी आहेत. पण गिझर रात्रभर वापरल्यास किंवा चुकून गिझर रात्रभर सुरु राहिल्यास त्याचा वीज बिलावर परिणाम होऊ शकतो. गिझर रात्रभर चालू राहिल्यास, तुमचे वीज बिल सुमारे 80 ते 100 रुपये किंवा त्याहूनही अधिक वाढू शकते. जेव्हा तुम्हाला गरम पाण्याची गरज असेल तेव्हाच गिझर चालू करा. दिवसभर गिझर ठेवण्याची गरज नाही.
जर तुम्हाला फक्त भांडी किंवा कपडे धुण्यासाठी गरम पाण्याची गरज असेल, तर बादलीत गरम पाणी भरा आणि नंतर गिझर बंद करा. सातत्याने गिझर चालू राहिल्यास वीज बिलात वाढ होऊ शकते. त्यामुळे आवश्यकता असेल तेव्हाच गिझर सुरु ठेवा. याने वीज बिलात चांगला फरक जाणवू शकेल.