प्रेमाची नेमकी व्याख्या नाही. पण प्रेमात फसवणूक करणे आणि प्रिय व्यक्तीचा विश्वास तोडणे हे मात्र आता सामान्य झाले आहे. असे असले तरी अशा व्यक्तीला आयुष्यातून दूर करणे फायद्याचे ठरू शकते. कोणत्याही नात्यात विश्वास असणे गरजेचे आहे. तसे जर नाही झालं तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
सध्या असे बरेच लोक आहेत जे रिलेशनशिपमध्ये राहूनही अनेक नाती ठेवतात. पण हे जर आपल्या जोडीदाराला समजलं तर भांडण, वाद होतात. पण अशा काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्यास आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ आहे की नाही, याची माहिती मिळू शकते. पण या गोष्टी सामान्य गोष्टींवर आधारित आहे.
सुरुवातीला, लोक प्रत्येक गोष्टीकडे किंवा जोडीदाराच्या समस्येकडे लक्ष देतात; परंतु कालांतराने या गोष्टी त्यांच्यासाठी त्यांचा अर्थ गमावतात. जर तुमचा जोडीदार काही काळ तुमचे ऐकत नसेल किंवा तुमच्या समस्यांची काळजी करत नसेल, तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की त्याचे लक्ष तुमच्याकडे नाही.
तसेच फोन कॉलकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाणे, कधी-कधी कॉल न उचलणे किंवा व्यस्त असणे हे सामान्य आहे; परंतु जर तुमचा जोडीदार फोन न उचलल्यानंतर दिवसभर फोन करत नसेल किंवा मेसेज पाहिल्यानंतरही दुर्लक्ष करत असेल तर तुम्हाला जोडीदाराशी बोलण्याची गरज आहे. काही प्रश्न बोलण्याने सोडवता येऊ शकतात. त्यामुळे बोलूनच पुढचा विचार करावा, असा सल्ला दिली जातो.