आपल्या जीवनात एकदातरी फॉरेन अर्थात परदेशात जाता यावं, अशी अनेकांची इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण देखील होते. पण तुम्ही जर परदेशात प्रवास करणार असाल तर प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
परदेशात प्रवास करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यात पॅकिंग करण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. नवीन कपडे, फोटोग्राफीसाठी कॅमेरा, स्किन केअर बॉक्स या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. अशा परिस्थितीत काही लोकं महत्त्वाची कागदपत्रे ठेवायला विसरतात. पण ही चूक चुकूनही करू नये. जेव्हाही तुम्ही परदेश दौऱ्यावर जाल तेव्हा सर्वप्रथम सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. अशाने पुढील अडचण टाळता येऊ शकते.
फिरायला जाण्यापूर्वी एक आठवडा आधी तुमचे फ्लाईट तिकीट, निवास व्यवस्था आणि इतर गोष्टी पुन्हा एकदा तपासा. कारण तिथे पोहोचल्यानंतर ते तुमच्यासाठी अडचणीचे कारण ठरू शकते. जर तुम्ही कंपनीच्या कामानिमित्त परदेशात जात असाल तर आधी लॅपटॉप, चार्जर, कागदपत्रे यासारख्या वस्तू बॅगेत ठेवा, जेणेकरून तुम्ही काहीही मागे ठेवू नये. या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी.