Diwali Shopping पुणे : सणासुदीला जवळपास सर्वच जण काहीना काहीतरी करून सण विशेषपणे साजरा करत असतात. त्यात आता दिवाळीचा सण सुरु होत आहे. या सणानिमित्त बहुतांश जणांनी खरेदी देखील केली असेल. मात्र, जर तुमच्यापैकी कोणी अजूनही खरेदी केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांकडे फराळाला, जेवायला जाण्याचे प्लॅन्स होतात. यावेळी आपण स्वत: उठून दिसण्यासाठी आपले कपडे, दागिने छान असावेत असं प्रत्येक महिलेला वाटत असते. मग साडी, अनारकली पॅटर्न, पंजाबी ड्रेस, घागरा, पलाझो किंवा नव्याने आलेले कॉर्ड सेट असे वेगवेगळे पॅटर्न घालून आपण सगळ्यांमध्ये उठून दिसू शकतो.
विविध प्रकारच्या साड्या
साडी हा पारंपरिक प्रकार असून, विविध प्रकारच्या काठा पदराच्या, डिझायनर किंवा स्टायलिश साड्या तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने नेसू शकता. साडीमध्ये तर कोणत्याही वयातील महिला सुंदरच दिसते. त्यामुळे सणाचा पारंपरिक लूक पूर्ण होण्यास मदत होते.
हेवी ओढणीने लूक दिसेल खुलून
तुम्हाला खूप हेवी ड्रेस नको असेल आणि तरीही दिवाळीसाठी मस्त लूक करायचा असेल तर तुम्ही सिंपल ड्रेस आणि त्यावर बनारसी, चंदेरी, कलमकारी प्रकारातील ओढणी नक्की घेऊ शकता. या हेवी ओढणीने तुमचा लूक खुलून येण्यास मदत होईल.
अनारकली ड्रेस
गेल्या काही वर्षांपासून अनारकली ड्रेसचा पॅटर्न सगळ्याच वयोगटात आवडीने वापरला जातो. पारंपरिक लूक देणारा घोळदार असा अनारकली छान दागिने घातले तर मस्त खुलून येतो. त्यामुळे या सणासुदीच्या काळात अनारकली ड्रेस परिधान केल्यास तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच खुलून दिसेल.