लग्नानंतर अनेक जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि त्यांचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी हनिमूनला जाण्याला प्राधान्य देतात. जर तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही ठिकाणांची माहिती देणार आहोत…
बाली हे अत्यंत देखणं आणि आकर्षक असं पर्यटनस्थळ आहे. बालीला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. हे ठिकाण केवळ सुंदरच नाही तर कमी बजेटमध्ये देखील आहे. तुम्ही येथे हनिमून ट्रिपचा आनंद घेऊ शकता. बालीला जाण्यासाठी तुम्हाला खूप स्वस्तात फ्लाईट मिळतील. 10 हजारांच्या आत तुम्हाला बालीची फ्लाईट मिळेल. कमी बजेटमध्ये परदेशात हनिमून साजरा करायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप सुंदर आठवणी तयार करू शकता.
बालीमध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. समुद्र पाहण्याबरोबरच, बालीमध्ये पाहण्यासारखी इतरही अनेक ठिकाणे आहेत. यात तनाह लोट, उलुवातु मंदिर, माउंट बतुर, बेसकीह मंदिर, लोविना आणि कांगू यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. बालीमध्ये तुम्हाला प्रतिरात्र 3 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत रुम मिळू शकते.
जर तुम्ही हनिमूनसाठी रिसॉर्ट बुक केले तर तुम्हाला 10,000 रुपयांच्या आत राहण्याची आणि जेवणासह सर्व काही मिळेल. त्यामुळे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला चांगल्या आणि आनंददायी क्षणाचा अनुभव घेता येईल.