सध्याच्या युगात पुरुषांसोबतच महिलादेखील कामाला जाताना दिसत आहेत. संसारात असो वा घरासाठी हातभार लावण्याचा हा एक पर्याय ठरताना दिसत आहे. असे जरी असले तरी नोकदार महिलांसाठी कामासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हटलं तर कर्नाटकातील बंगळुरू अर्थात बँगलोरचं नाव पुढे येते.
बँगलोर हे महिलांसाठी राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून नुकतेच एका अहवालात घोषित करण्यात आले आहे. या अहवालात, भारतातील 120 शहरांना सरकारी डेटा आणि संशोधनावर आधारित गुण देण्यात आले आहेत. यामध्ये महिलांना राहण्यासाठी शहर किती सुरक्षित आहे, महिलांसाठी रोजगाराच्या किती संधी आहेत, वाहतुकीची सोय किती आहे, राहण्यासाठी घरांची व्यवस्था काय आहे, सरकारी संस्था किती कार्यक्षमतेने आहेत हे पाहण्यात आले. त्यामध्ये बँगलोरचे नाव आले आहे.
बँगलोरने भारतातील इतर कोणत्याही शहरापेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि अव्वल मानांकन प्राप्त केले आहे. बँगलोरनंतर मुंबई, हैदराबाद, पुणे, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, गुरुग्राम आणि कोईम्बतूर या शहरांचा यादीत समावेश आहे. केरळही चांगला पर्याय आहे. केरळमध्ये बँगलोरपेक्षा प्रवासाचा खर्च कमी आहे. केरळमधील कामाचे वातावरण बँगलोरपेक्षा अधिक आनंददायी असल्याचे काही महिलांचे म्हणणे आहे.