तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर फिरायला नेण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला दिल्लीतील काही ठिकाणांची माहिती देणार आहोत. तिथं गेल्यास तुमच्या मुलांना चांगला आनंद मिळू शकेल. त्यात ‘वर्ल्ड ऑफ वंडर’ हे नोएडा येथील एक मनोरंजन उद्यान आहे, जे उत्तर भारतातील सर्वात मोठे मनोरंजन उद्यान आणि वॉटर पार्क आहे. हे ठिकाण मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
‘वर्ल्ड ऑफ वंडर’ येथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते. बोटींग, रेन डान्स आणि अनेक प्रकारचे व्हिडिओ गेम्सची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर हे स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. 141 फूट उंच, 316 फूट रुंद आणि 356 फूट लांब अक्षरधाम मंदिरात हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा पाहायला मिळतो. अक्षरधाम मंदिराच्या जवळचे मेट्रो स्टेशन अक्षरधाम आहे.
प्रसिद्ध कुतुबमिनार हेदेखील उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण राजधानी दिल्लीत आहे. या सँडस्टोन टॉवरचे बांधकाम 1192 मध्ये सुरू झाले. हा विटांनी बनलेला जगातील सर्वात उंच टॉवर असल्याचे सांगितले जाते. इतर ऐतिहासिक स्थळांनी वेढलेले, हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्मारकांपैकी एक आहे. याशिवाय, राष्ट्रीय बालभवन ही मनुष्यबळ मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे, ज्याचे मुख्यालय ITO, नवी दिल्ली येथे आहे. हे देखील एक लोकप्रिय असे ठिकाण आहे.