लग्न म्हटलं की प्रेमाचं एक अतूट नातं, अशीच सध्याची स्थिती आहे. पण आपला जोडीदार चांगला असावा असे सर्वांनाच वाटत असतं. मग तरूण असो वा तरूणी. जोडीदाराची निवड चांगली असावी यासाठी प्रयत्न केले जातात. पण तरूणींना आपल्या भावी पतीपासून अनेक अपेक्षा असतात. मात्र, लग्नापूर्वी काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.
लग्नानंतर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, नोकरी करायची असेल किंवा लग्नानंतर घरी राहायचे असेल या विषयावर नवऱ्यामुलाशी अगोदर बोलून घ्या. त्याचा प्राधान्यक्रमही जाणून घ्या. तुमचा अभ्यास आणि करिअर त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतल्याशिवाय पुढचा विचार करू नका.
तसेच लग्नानंतरचा तुमचा घरगुती खर्च आणि गुंतवणूक याबद्दल बोला. तुमच्या पतीवर घराची जबाबदारी असू शकते, अशा परिस्थितीत तुमच्या इच्छेनुसार खर्च आणि गुंतवणूक करण्यास त्याला कमी वाव असू शकतो. लग्नानंतर बहुतेक वाद याच मुद्द्यावरून होतात. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हा दोघांना अगोदरच स्पष्ट कराव्यात.