नवी दिल्ली : घरात सारखं गरम होत असेल तर फॅन नंतर ज्याला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे एअर कंडिशनर अर्थात एसीला. भारतीय बाजारपेठेत विविध किमतीच्या रेंजमध्ये अनेक एसी उपलब्ध आहेत. पण एअर कंडिशनर निवडताना अनेक गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. त्यानंतर खरेदी केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
भारतात, LG, Samsung, Voltas, Ozgeneral, Panasonic, Daikin, Havells Lloyd, Godrej, Blue Star, Whirlpool, Cruze आणि Carrier यांसारख्या डझनभर कंपन्या त्यांचे एअर कंडिशनर्स वेगवेगळ्या किमतीच्या रेंजमध्ये देत आहेत.
1. हायर 1.5 टन 3 स्टार फिक्स्ड स्पीड विंडो एसी
1.5 टन क्षमतेचा हा फिक्स्ड स्पीड एसी लोकांसाठी 4 फॅन स्पीड, डायनॅमिक कूलिंग, फिल्टर डायग्नोस्टिक यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. हा विंडो एसी 150 स्क्वेअर फूट आकाराची खोली 54 अंश उष्णतेमध्येही थंड ठेवू शकतो. हायर विंडो या एसीची किंमत 29,800 रुपये आहे.
व्होल्टास 1.5 टन 3 स्टार, फिक्स्ड स्पीड विंडो एसी
1.5 टन क्षमतेसह, हा व्होल्टास एसी 3 स्टारच्या पॉवर रेटिंगसह येतो आणि तुमच्या 150 चौरस फूट खोलीसाठी विशेष असा आहे. हा 1.5 टन एसी 48 अंश तापमानात खोली थंड ठेवतो. हे एअर कंडिशनर ऑटो स्विंग, अँटी रस्ट कोटिंग, सेल्फ डायग्नोस्टिक आणि टर्बो मोड यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतो. व्होल्टास विंडो एसीची किंमत 27,900 रुपये आहे.