नवी दिल्ली : आपल्यापैकी असे अनेकजण आहेत त्यांचा फिरायला जाण्याचा प्रयत्न असतो. त्यानुसार, त्यांच्याकडून तयारीही केली जाते. पण अमरनाथ यात्रेला जाण्याचा तुमचा प्लॅन असेल तर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकते. अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घ्या. कारण, तिथल्या वातावरणात सूट होईल असेच कपडे असावेत.
तुमच्यासाठी आरामदायक असतील असे कपडे सोबत ठेवा. जर तुम्हाला सैल कपड्यांमध्ये आरामदायक वाटत असेल तर ते कपडे तुमच्या बॅगमध्ये ठेवा. खूप टाईट असे कपडे कधीही नेऊ नका. त्यामुळे तुम्हाला तेथे चढण्यास अडचण येऊ शकते. याशिवाय घट्ट कपड्यांमध्ये श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अमरनाथ यात्रेला जाताना रेनकोट सोबत ठेवा. कारण तिथे कधीही पाऊस पडू शकतो. यामुळे पावसापासून बचाव करता येऊ शकतो.
तसेच अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक वेळा तापमान खूपच खाली जाते. अशा परिस्थितीत लोकरीचे अर्थात वूलन कपडे सोबत ठेवा. कारण, तिथं अशा गोष्टी महाग मिळू शकतात. त्यामुळे जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. याशिवाय, कधीकधी आपल्या आकाराचे परिपूर्ण कपडे मिळण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत चांगल्या दर्जाचे लोकरीचे कपडे सोबत ठेवा.