नातं कोणतंही असो मग ते पती-पत्नीचे असो वा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे, त्यामध्ये चढ-उतार हे येतच असतात. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. त्यात रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या तरुण अथवा तरूणींना विशेष काळजी घ्यावी लागते. जेव्हा गर्लफ्रेंड अर्थात प्रेयसीच्या वागण्यात थोडाही बदल जाणवला तर समजून जा की यात काही अडचण आहे.
जेव्हा तुमच्या गर्लफ्रेंडचे वागणे अचानक बदलते तेव्हा ती तुमच्याशी ब्रेकअप करण्याचा विचार करत असल्याचे मोठे लक्षण असू शकते. नात्यातील प्रत्येक बदलाचा अर्थ ब्रेकअप असा होत नाही. मात्र, तरीही काही सवयी आणि कृती नक्कीच नातेसंबंध तुटण्याचे संकेत देतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर भांडणे किंवा एकमेकांवर रागावणे हे दर्शवू शकते की व्यक्ती नात्यात खूश नाही आणि तुम्ही त्यापासून दूर राहावं असंच काहीसं सुचवलं जातं. त्यात तुमच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे देखील एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. तेव्हा तुमच्या भावना असो किंवा समस्या याकडे फारसे महत्त्व दिले जात नाही.
जर गर्लफ्रेंड तुमच्या भावनांकडे वारंवार दुर्लक्ष करत असेल तर हे एक मोठे लक्षण असू शकते. याशिवाय, जिथं आधी गर्लफ्रेंड प्रत्येक लहान-मोठी गोष्ट तुमच्याशी शेअर करायची, तिथे आता तिने तुमच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली असेल त्यात फोन कॉल्स आणि मेसेजना कमी रिस्पॉन्स देत असेल काळजी घ्यावी, हे देखील ब्रेकअपचे एक संकेत असू शकते.