आपलं मूल जसजसं मोठं होत जातं तसतशी पालकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते. पण काही पालक चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडतात तर काही पालक अडखळतात. मात्र, पालकांनी मुलांचे संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास फायद्याचे ठरते. काही चुका टाळल्यास मुलांवर चांगले संस्कार होतात.
पालक आपल्या मुलांची तुलना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांच्या मुलांशी करू लागतात, जेव्हा त्यांना चांगले गुण मिळतात. तुलना करताना पालकांना आपण त्यावेळी काय करत आहोत हे समजत नाही, पण त्याचा मुलावर विपरीत परिणाम होऊ लागतो. जाणूनबुजून किंवा नकळत तुमच्या मुलाला शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या मुलांचा हेवा वाटू लागतो. तेव्हा मुलांच्या आत निर्माण होणारी ही भावना त्यांना हिंसक देखील बनवू शकते.
आपण मुलांचे लाड करत जरी असलो तरी त्यावर मर्यादा असणे गरजेचे असते. मुलांचे जास्त लाड केल्याने देखील भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. अशी मुले लहानसहान गोष्टींसाठी पालकांवर अवलंबून असतात. हे पुढील जीवनाच्या दृष्टीने विचार करायला लावण्यासारखे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गरजेपुरताच लाड केल्यास फायद्याचे ठरते.