Winter Fashion Tips : राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागायला सुरवात झाली आहे. काही ठिकाणी हवेत गारवा वाढल्याचे दिसत आहे. खास करून पहाटे हवेतील गारठा वाढल्याचं चित्र आहे. अशावेळी आपल्या कपड्यांपासून ते आहारापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये बदल केला जातो. काही स्टाइलिंग टिप्स आहेत ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही फॅशनेबल दिसू शकता.
रंगबिरंगी स्कार्फ : स्कार्फ अथवा स्टोल हिवाळ्यात तुमचं थंडीपासून बचाव करण्यास मदत करतात. मात्र एवढंच नाही तर एखाद्या छानशा रंगीत स्टोल अथवा स्कार्फमुळे तुमच्या लुकमध्येही छान चेंज होतो. आजकाल गडद रंगाचे अथवा मल्टी कलर स्कार्फ बाजारात सहज मिळतात. तुम्ही कोणत्याही ड्रेस अथवा वेस्टर्न आऊटफिटसोबत ते मॅच करू शकता.
ओव्हरसाईज स्वेटर : आजकाल ओव्हरसाईज कपड्यांचा ट्रेंड वाढला आहे. लोक स्टाईलपेक्षा आरामाला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे तुम्ही आरामात स्टायलिश दिसण्यासाठी ओव्हरसाईज टी-शर्ट आणि जीन्स घालू शकता. स्पोर्ट्स शूज सोबत ठेवा.
विंटर ड्रेस : यावेळी तुम्ही हिवाळ्यात लाँग ड्रेसही ट्राय करू शकता. लांब बूट किंवा हील एक लांब हिवाळी ड्रेसला शोभा देतात. ड्रेसची लांबी लक्षात घेऊन हील्स निवडा. यासोबत तुम्ही लांब कोटही कॅरी करू शकता.
हॅंड ग्लोव्ज : हात थंडीपासून वाचावेत यासाठी तुम्ही लोकरीचे ग्लोव्ज हातात घालू शकता. आजकाल अनेक स्टायलिश ग्लोव्ज बाजारात मिळतात. हे ग्लोव्ज तुमच्या हाताचे थंडीपासून संरक्षण करतातच शिवाय त्यामुळे तुम्ही स्टायलिशही दिसू शकता.
इअर मफ : आजकाल तुम्हाला कुठेही आकर्षक इअर मफ विकत मिळतात. कानात थंडी भरली तर तुम्हाला जास्त थंडी लागते. यासाठी कानाचे थंडीपासून संरक्षण करणं गरजेचे असते. इअर मफमुळे तुमच्या कानाला थंडी लागत नाही. प्रवासात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एअर मफ वापरू शकता. विशेष म्हणजे त्यामुळे तुम्हाला एक छान कोझी लुक मिळतो.