सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे दुपारी बाहेर जाताना काळजी घ्यावी लागते. परिणामी, याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यात थंड पेयांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. काही असे पेय आहेत ज्याचं सेवन केल्याने या उष्ण वातावरणात चांगला फायदा होऊ शकतो.
लिंबू सरबत उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. ते नियमितपणे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अनेक आरोग्यसंबंधी आजारांपासून बचाव होतो. तसेच तुम्हाला ते दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते आणि तुमची नैसर्गिक चमक टिकवून ठेवते. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. लिंबू अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. उन्हाळ्यात त्याचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आरोग्यासाठी फायदे देण्यासोबतच ते त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी रक्त स्वच्छ करतात. याशिवाय, ताक हे उन्हाळ्यातील सर्वात आवडते पेय आहे. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असल्याने ते एक नैसर्गिक प्रोबायोटिक देखील आहे.
लस्सी देखील फायदेशीर ठरू शकते. लस्सीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे तुमच्या त्वचेचे पोषण आणि आरोग्य राखण्यास मदत करतात. हे लॅक्टिक ऍसिडचे समृद्ध स्त्रोत आहे, जे त्वचेवरील डाग काढून टाकण्यास मदत करते. तसेच याचे उन्हाळ्यात सेवन केल्यास नक्कीच फायदा होतो.