आपण निरोगी राहावं यासाठी पोषक आहारासोबतच व्यायाम करण्याला प्राधान्य दिलं जातं. आपण अनेकदा सकाळी चालणे किंवा सकाळी व्यायामाच्या फायद्यांविषयी ऐकले असेल. पण तुम्हाला माहितीये का फक्त सकाळीच नाहीतर संध्याकाळीदेखील व्यायाम करण्याचे आहेत बरेचसे फायदे.
संध्याकाळच्या वेळी व्यायाम करणे हा शरीराला डिटॉक्स करण्याचा उत्तम पर्याय आहे. व्यायाम केल्यामुळे तणावाची पातळी कमी होऊन मनाला आणि आरोग्याला फायदे होतात. व्यायाम, मुद्रा, योगासने केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगले राहते. शरीरातील तणाव कमी होऊन मन शांत राहण्यास मदत होते. मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित संध्याकाळच्या वेळी व्यायाम केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
तसेच संध्याकाळच्या वेळी व्यायाम केल्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी स्नायूमध्ये अधिक ताकद आणि लवचिकता असते. शरीराचे तापमान पुरेसे असल्यामुळे स्नायूंदेखील चांगला फायदा होतो.