Kitchen Tips : भारतातील घरांमध्ये स्वयंपाकघराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या घराचे स्वयंपाकघर नेहमीच चमचमीत ठेवायचे असते, परंतु अनेक प्रयत्नांनंतरही स्वयंपाकघरातील भांडी चिकट आणि कळकट्ट होतात. अशी अनेक भांडी आहेत जी खूप वापरली जातात. यामध्ये प्रामुख्याने चहाच्या भांड्यांचा समावेश आहे.
घरांमध्ये चहा सर्वाधिक बनवला जातो. चहा वारंवार तयार केल्यामुळे भांड्याचा तळ जळतो. इतकेच नाही तर काही वेळा भांड्याच्या आत विचित्र घाण साचते, जी घासल्यानंतरही साफ करता येत नाही. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
बेकिंग सोड्याचा करा वापर
बेकिंग सोडा खाण्यात वापरला जातो, परंतु तुम्ही चहाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी सर्वप्रथम चहा बनवण्याच्या भांड्याभोवती सोडा टाका आणि पाच मिनिटे असेच राहू द्या. आता ते डिशवॉशर आणि पाण्याने स्वच्छ करा. यामुळे भांड्यातील घाण साफ होईल.
भांड्यावर लिंबू घासा
चहाच्या घाण झालेल्या भांड्यावर लिंबू घासल्यास भांडी लवकर साफ होतात. तुम्हालाही ही टीप घ्यायची असेल तर अर्धा लिंबू कापून जळलेल्या भांड्यावर चोळा. आता त्यात गरम पाणी घालून सोडा. यामुळे भांड्यातील काळेपणा दूर होईल.
व्हिनेगर वापरा
चहाची जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये व्हिनेगर घाला आणि बेकिंग सोडा थोडा मिक्स करून ते भांड्यामध्ये तसंच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाणी आणि डिशवॉशरने घासल्यावर त्वरीत हे डाग निघून जातील.
मिठाने स्वच्छ करा
चहा किंवा दुधाचे भांडे जळत असल्यास त्यात २ चमचे मीठ टाका आणि नंतर पाणी भरा, लिक्विड डिशवॉशर साबण घाला आणि हलका गरम करा. आता तासभर असेच सोडल्यानंतर चमच्याने चोळा. यानंतर तुम्हाला कापडाने भांडी स्वच्छ करावी लागतील. यानंतर तुमचे भांडे स्वच्छ होते.