आरोग्यासोबतच चेहऱ्याकडे लक्ष देणारे आपल्यापैकी अनेक जण असतील. आपण सुंदर, गोरं दिसावं यासाठी प्रयत्न केले जातात. तुम्हीही याच्या प्रयत्नात असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. कारण, याच चुकांमुळे चेहऱ्यावरचा ग्लो जाण्याची जास्त शक्यता असते.
सकाळी उठल्याबरोबर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर रात्रभर जमा होणारे बॅक्टेरिया निघून जातात. असे न केल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही पुरेसे पाणी न पिल्यास, तुमची त्वचा कोरडी आणि थकलेली दिसू शकते. अशा परिस्थितीत, सकाळी उठल्याबरोबर शरीराला हायड्रेट करणे महत्वाचे असते. सनस्क्रीन न लावणे हेदेखील ग्लो कमी होण्याचे कारण ठरू शकते. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. ज्यामुळे त्वचेची चमक कमी होऊ शकते.
सकाळी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. तुम्ही असे केले नाही तर तुमच्या त्वचेची चमक कमी होऊ शकते. बऱ्याच लोकांना असे वाटते की जास्त वेळ आंघोळ केल्याने त्यांची त्वचा चमकते. मात्र, तसे नाही. वास्तविक, जास्त वेळ आंघोळ केल्याने शरीरातील नैसर्गिक तेल नष्ट होते. यामुळे, त्वचा हळूहळू कोरडी होते आणि तिची चमक जाते. त्यामुळे या गोष्टींकडेही लक्ष द्या.