भारत हा एक समृद्धतेने नटलेला देश आहे. देशात अनेक वनस्पती, फळे-झाडं आहेत, त्याचे फायदेही आहेत. तसेच भारतात अनेक चहाच्या बागादेखील आहेत. त्याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दीही पाहिला मिळते. त्यात पालमपूर, मुन्नार, जोरहाट यांचा समावेश आहे.
हिमाचल प्रदेशातील कांगडा खोऱ्यातील पालमपूर हे नैसर्गिकरित्या समृद्ध असे हिल स्टेशन आहे. ते चहाच्या मळ्या आणि पाईनच्या जंगलांनी वेढलेले आहे. पालमपूर ही उत्तर-पश्चिम भारताची चहाची राजधानी आहे. ज्यामुळे ते विशेष आवडीचे ठिकाण ठरत आहे. या ठिकाणी तुम्ही निर्मळ वातावरण तसेच निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेऊ शकता. केरळमधील मुन्नार येथील चहाची बागही विशेष अशी आहे.
केरळमधील मुन्नार येथील चहाची बागेत जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी येतात. हिल स्टेशनच्या गोलाकार टेकड्यांवर सारख्याच उंचीची चहाची रोपे पाहणे डोळ्यांना खूप आनंद देते. येथे उंचावरून कोसळणारे धबधबे आणि थंड हवामान सर्वांनाच आकर्षित करतात.
याशिवाय, खोऱ्याच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या जोरहाटला ‘जगाची चहाची राजधानी’ म्हणूनही ओळखले जाते. जोरहाट टी बंगलो पर्यटकांसाठी चहाच्या बागांसह निवासाचा एक पर्याय देते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या चहाच्या बागांमध्ये राहण्याचा एक वेगळाच आनंद आहे.