सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास चावल्यामुळे अनेक आजार उद्भवतात. याच दिवसांत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा फैलाव झपाट्याने होताना दिसून येतो. त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसांत डासांपासून जितकं दूर राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करावा.
आपण असे काही घरगुती उपाय करून अगदी घरच्या घरी डास पळवू शकतो. अनेकदा रात्र होताच बऱ्याच लोकांच्या घरामध्ये डासांचे पसार जास्त दिसतो. तुमच्याही घरात डासांचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही घरामध्ये इंसेक्ट स्प्रेचा वापर करू शकता. इंसेक्ट स्प्रे मार्केटमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहे. मात्र, याचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर याचा वापर केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.
डासांची समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणजे काही झाडे तुम्ही लावू शकता. लेमन बाम, तुळस, लेव्हेंडर, मंदी ही झाडे तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीमध्ये एखादी कुंडी ठेऊन त्यामध्ये लावू शकता. यामुळे नैसर्गिकरित्या डास दूर होण्यास मदत मिळते.
आपल्याला डास चावू नये असे वाटत असेल तर पूर्ण बाही अर्थात फुल स्लिव्हचे कपडे परिधान करावेत. हे कपडे वापरतानाच कपडे जास्त सैल न राहतील याचीही काळजी घ्यावी. अशाप्रकारचे कपडे परिधान केल्यास मच्छर चावण्यापासून आपण आपला बचाव करू शकतो.