नवी दिल्ली : भारतात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे फिरायचा जायचा विचार झाल्यास त्याचा प्लॅन करावा लागतो. पण तुम्ही धार्मिक वास्तूंना भेट देण्यास इच्छुक असाल तर आम्ही तुम्हाला काही आश्रमांची माहिती देणार आहोत. भारतात असे आश्रम आहेत तेथे राहण्यासाठी लागत नाहीत पैशांची गरज.
उत्तराखंडमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ ऋषिकेश. या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. येथे लोक खूप दूरवरून येतात. ऋषिकेश या अध्यात्मिक शहरात राहण्यासाठी तुम्हाला अनेक छोटी-मोठी हॉटेल्स मिळतील, पण जर तुम्हाला पैसे खर्च न करता राहायचे असेल तर भारत हेरिटेज सर्व्हिसेसमध्ये नक्की जा. ऋषिकेशच्या या आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता. इथे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. येथे सर्व सुविधा मोफत आहेत, त्या बदल्यात तुम्हाला स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल.
तसेच तामिळनाडूतील तिरुवन्नमलाईच्या टेकड्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. जर तुम्ही तिरुवन्नमलाईच्या टेकड्यांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रामनाश्रम येथे राहू शकता.
याशिवाय, दररोज हजारो पर्यटक मोठ्या संख्येने हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला भेट देण्यासाठी येतात. हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण नावाच्या ठिकाणी तुम्हाला मोफत राहण्याची सोय होईल. येथे तुम्ही मणिकरण साहिब नान यांच्या आश्रमात मोफत राहू शकता. येथे राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.