आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी प्रयत्नही केले जातात. त्यात ऑफिस किंवा घरी असणाऱ्या एसी अर्थात एअर कंडिशनरमुळे चेहऱ्यासह आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पण अशा काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरते.
एसीच्या हवेत आर्द्रता नसते, त्यामुळे त्वचेची आर्द्रताही निघून जाते. त्वचा कोरडी आणि ताणलेली वाटते. कमी आर्द्रतेमुळे, त्वचा कोरडी होते. शिवाय, ओठही फुटतात आणि डोळे देखील कोरडे होऊ लागतात. कोरड्या त्वचेमुळे ती बऱ्यापैकी कोमेजलेली आणि निस्तेजही दिसते. एसीची हवा त्वचेतील आर्द्रता शोषून घेते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि पुरळही येऊ शकतात. सुरकुत्या आणि बारीक रेषाही दिसू लागतात.
तसेच घाम येणे केवळ शरीराचे तापमान संतुलित करण्यास मदत करत नाही तर हे शरीरातील विषारी पदार्थ देखील काढून टाकतात. परंतु एसीची थंड हवा घाम येण्यास प्रतिबंध करते, त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते.
एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. वास्तविक, एसीच्या हवेत त्वचा कमी तेल तयार करते. यात त्वचेवर कोरडेपणाची समस्या वाढते. त्यामुळे या सर्व परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी लागते.