पुणे प्राईम न्यूज : स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने आजकाल पुरूषदेखील स्वयंपाकात रस घेतात. खरंतर घरातील प्रत्येकाला किचन मॅनेजमेंट यायलाच हवं. आज आम्ही तुमच्यासोबत काही सोप्या कुकिंग टिप्स शेअर करत आहोत, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. ज्या फॉलो करून अवघड वाटणारे जेवण चविष्ट तर होईलच, शिवाय तासन्तास वेळ लागणारे काम मिनिटात पूर्ण होऊन तुमचा वेळही वाचेल. चला तर मग त्या कुकिंग टिप्स जाणून घेऊयात…
– लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो.
– डोसे करताना पिठात थोडेसे शाबुदाण्याचे पीठ घालावे, त्याने डोसे कुरकुरीत होतात.
– दहिवडा मऊ होण्यासाठी पिठात दोन उकडलेले बटाटे बारिक करून घालावेत.
– साखर मुग्यांपासून वाचवण्याकरता साखरेच्या डब्यात लवंग ठेवावे.
– तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर घट्ट होते आणि चविष्ट लागते.
– भजी कुरकुरीत करण्यासाठी पिठात गरम पाणी घालावे.
– तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत, याने छोले मऊ होतात.
– भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो.
– दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट होते.
– दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे.
– दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दुध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे.
– कारले चिरून लिंबू , मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, यामुळे भाजी कडू होत नाही.
– वांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे