सध्या अनेकजण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. पण आपल्या घरात वॉशिंग मशीन असली तरी ती लावण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. आपल्या नेहमीच्या वॉशिंग मशीनहूनही अधिक फास्ट असायला हवी, असे कधी वाटत असेल, तर ते आता खरे होणार आहे. प्रसिद्ध कंपनी सॅमसंगने एक नव्या रेंजमधील आर्टिफिशियल इंटेलिजेन्ससह (AI) हिंदी आणि इंग्रजी यूजर इंटरफेस कनेक्टेड वॉशिंग मशीन लाँच केली आहे.
सॅमसंगने लाँच केलेली ही मशीन पूर्णपणे ऑटोमॅटिक फ्रंट लोड वॉशिंग मशीन आहे आणि कंपनीच्या पॉवरिंग डिजिटल इंडियाच्या नव्या व्हिजनचा भाग आहे. ही वॉशिंग मशीन सॅमसंगच्या ‘इको बबल’ आणि ‘क्विक ड्राईव्ह’ टेक्नॉलॉजीशी जोडलेली आहे. ही टेक्नॉलॉजी वेळ आणि वीज वाचवण्यासाठी मदत करते. तसेच ही मशीन 45 टक्के अधिक फॅब्रिक केअर देण्यासह वेळ आणि विजेची बचत करेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, AI-इनेबल्ड लॉन्ड्री लाईन-अप भारतात सर्व रिटेल दुकानात 35,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याशिवाय काही निवडक मॉडेलला ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाईन स्टोअर सॅमसंग शॉपमधून खरेदी करता येऊ शकते.
21 नवे मॉडेल उपलब्ध
या नव्या लाईन-अप वॉशिंग मशीनमध्ये 21 नवे मॉडेल्स देण्यात आले आहेत. हे सर्व मॉडेल्स AI फीचरसह आहेत. ही वॉशिंग मशिन सॅमसंगचे स्मार्ट डिव्हाईस गॅलेक्सी स्मार्टफोन, सॅमसंग स्मार्ट टीव्ही आणि फॅमेली हब रेफ्रिजरेटर्स, अलेक्सा, गुगल होमसारख्या व्हाईस डिव्हाईसेसशी कनेक्ट करता येऊ शकते.