पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. हा ऋतू बहुतांश लोकांच्या आवडीचा आहे. या दिवसांत लग्नसोहळाही आयोजित केले जातात. त्यामुळे जोडप्यांनी आधीच हनिमूनला जाण्याचा विचार केला असेल तर भारतात अनेक परवडणारी आणि सुंदर ही अशी पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही थंड हवामानाचा आनंद घेताना एक अद्भुत आणि रोमँटिक अनुभव घेऊ शकता.
भारतातील हिवाळी हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत खूप आनंददायी असतो आणि ही ठिकाणे तुम्हाला हनिमूनचा अनुभव देण्यासाठी योग्य आहेत. त्यात काश्मीर हा एक उत्तम पर्याय आहे. काश्मीरचे सौंदर्य हिवाळ्यात, जेव्हा बर्फवृष्टी होते तेव्हा आणखीनच वाढते. येथील गुलमर्ग, पहलगाम आणि सोनमर्ग सारखी हिल स्टेशन्स रोमँटिक हनिमूनसाठी चांगली अशी ठरतात. उटी हेदेखील अतिशय परवडणारे आणि सुंदर हनिमून डेस्टिनेशन आहे. डिसेंबरमध्ये येथील हवामान अतिशय थंड आणि आल्हाददायक असते.
‘निलगिरीची राणी’ म्हणून ओळखले जाणारे उटी हे एक शांत आणि परवडणारे हिल स्टेशन आहे. येथील हवामान हिवाळ्यात अतिशय थंड आणि आरामदायी असते. चहाच्या बागा, उटी तलावावर बोटिंग आणि बागा. येथील ट्रेकिंग आणि हायकिंग ट्रेल्सही खूप लोकप्रिय आहेत. राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर हे एक अनोखे हनिमून डेस्टिनेशन आहे. येथील सोनेरी वाडे, किल्ले आणि वाळवंटातील सफारी अतिशय रोमांचक आहेत. याचा खर्चही कमी आहे.